Skip to content Skip to sidebar Skip to footer

marathi typing lessons pdf free download

Marathi-Vyakaran-PDF

Click here to Download Marathi Vyakaran PDF Free Download | मराठी व्याकरण – संपूर्ण मराठी व्याकरण

स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना 'स्वर' असे म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले (म्हणजेच विवृत असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.

Marathi Vyakaran PDF  मराठी व्याकरण – संपूर्ण मराठी व्याकरण

Name of PDF Book संपूर्ण मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF
Language मराठी
PDF Size 90 MB
No of Pages 363
Buy Book From Amazon

मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF  Free Download

आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्या वेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदा. 'सूर्य उदय झाला.' असे न म्हणता 'सूर्योदय झाला.' असे आपण सहज बोलून जातो. 'इति आदी' न म्हणता आपण 'इत्यादी' असा शब्द बनवतो. 'वाक् मय' याच्याऐवजी 'वाङ्मय' असा एक शब्द तयार करून आपण बोलतो.

अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दत एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्या वेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातीत पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.

जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF  Free Download हे ध्वनी कागदावर लिहून दाखविताना आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वर्नीच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून 'बदक' हा शब्द तयार झाला.

एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे. 'पाणी' हा शब्द आहे. पाण्यात' हे पद आहे. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांनादेखील स्थूलमानाने शब्द असे म्हटले जाते. 'स्वातीने' हे पद आहे. यात मूळ शब्द 'स्वाती' आहे. मूळ शब्दाला व्याकरणात 'प्रकृती' असे म्हणतात. 'ने' हा प्रत्यय आहे. इथे शब्दाच्या मूळ रूपाला म्हणजे प्रकृतीला 'ने' हा प्रत्यय लागून 'स्वातीने' हे जे रूप झाले त्याला 'विकृती' असे म्हणतात. विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप यालाच 'पद' असे म्हणतात. वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते.

शब्दांच्या जाती आठ आहेत. हे मागील पाठामध्ये आपण पाहिले. विकारी आणि अविकारी अशा दोन गटांत त्यांची विभागणी होते. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना विकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे शब्दांचे प्रकार अविकारी शब्दप्रकारात मोडतात.

"वस्तू' या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF  Free Download प्रत्यक्षात असणान्या किंवा कल्पनेने जाणतेत्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. उदा पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग, अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य, खरेपणा, औदार्य, विद्वता इत्यादी.

Invisible Man PDF

Tuesdays with Morrie PDF

निरनिराळ्या वस्तूंच्या पदार्थांच्या व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की, ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी किंवा त्याचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो, त्याता नाम असे म्हणतात. 'मराठी घटना, रचना, परंपरा' या ग्रंथात (लेखक अरविंद मंगरूळकर व कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी) नामाची व्याख्या करताना म्हटले आहे. वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्या शब्दांना नामे असे म्हणतात '

प्रत्येक वाक्य हे एखाद्या कुटुंबासारखे आहे. कुटुंबात आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी अशा विविध नात्यांची काही माणसे एकत्र येतात. कुटुंबात एक व्यक्ती प्रमुख असते. या प्रमुख व्यक्तीशी त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष असे नाते असते. हीच गोष्ट वाक्यातही पाहावयास मिळते. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.

वाक्यात जे शब्द येतात, ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो. उदा – 'शेजारी, मधू, रस्ता, कुत्रा, काठी, मार' असे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF या शब्दसमूहाला वाक्य म्हणता येत नाही. ते वाक्य होण्यासाठी 'शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.' अशा स्वरूपात शब्दरचना करायला हवी. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याता व्याकरणात विभक्ती असे म्हणतात.

पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले. पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच तहान मुले उभी होती. पंतप्रधान तहान मुलांकडे गेले. पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले पंतप्रधानांना आनंद झाला.

वरीत परिच्छेदात थोडा बदल करून तो पुन्हा लिहूया आता वाचा. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच तहान मुले होती ते लहान मुलांकडे गेले. एका तहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना आनंद झाला

वरील दोन्ही परिच्छेदांचे वाचन केल्यावर लक्षात येईल की प्रारंभी 'पंतप्रधान' या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुन पुन्हा अयोग्य वाटतो दुसऱ्या परिच्छेदात, प्रारंभी 'पंतप्रधान' या नामाचा उल्लेख केल्यानंतर त्या नामाऐवजी 'ते', 'त्यांना' असा उल्लेख योग्य वाटतो. नामाचा पुनः पुन्हा येणारा उल्लेख कानाला खटकतो दुसऱ्या परिच्छेदात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी 'ते', 'त्यांना' असा उल्लेख आता आहे. अशा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

One Up on Wall Street PDF

I Too Had a Love Story PDF

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय, हे आपण पाहिले. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात, हेही आपण पाहिले. खेळतो या शब्दात 'खेळ' हा धातू आहे. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF 'तो' हा प्रत्यय लागून 'खेळतो' हे क्रियापदाचे रूप बनते. त्याचप्रमाणे 'खेळ' या धातूला प्रत्यय लागून खेळणे, खेळताना, खेळणारा' अशा प्रकारची क्रियादर्शक रूपेही तयार होतात. पण ती वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचे काम करीत नाहीत. धातूपासून बनलेल्या, धातूपासून साधलेल्या अशा रूपांना धातुसाधिते असे म्हणतात.

संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते. जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, तेव्हा धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला 'सहायक क्रियापद' असे म्हणतात. 'अस, नस, हो, ये, जा, दे, लाग, टाक, शक, पाहिजे, नको' कगैरे ठरावीक धातूंवरून सहायक क्रियापदे बनतात. यांतील 'अस, हो, नस' हे धातू काळाचे प्रकार दाखवितात. 'पाहिजे, नको, नये, नलगे' हे अर्थाचे प्रकार दाखवितात. सहायक क्रियापदे सर्व काळी, सर्व पुरुषी चालत नाहीत, म्हणून त्यांना गौण क्रियापदे असेही म्हणतात.

आतापर्यंत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार शब्दप्रकारांचा अभ्यास केला. या चार शब्दप्रकारांवर लिंग, वचन, विभक्ती किंवा काळ व अर्थ यांचा परिणाम होऊन या प्रकारांतील शब्दांच्या रूपात कसा बदल होतो, हे आपण पाहिले. शब्दांच्या आठ प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या प्रकारांना विकारी असे म्हणतात. कारण वाक्यात त्यांचा उपयोग होत असताना, लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन या प्रकारातील शब्दांच्या रूपात बदल होतो.

आता आपण अविकारी शब्दप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय या शब्दप्रकारांना अविकारी असे म्हणतात. कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्या शब्दप्रकारांतील शब्दांच्या रूपांमध्ये काही बदल होत नाही.

नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला 'नाम विशेषण' किंवा 'विशेषण' असे म्हणतात, हे आपण पाहिले त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दत अधिक माहिती देणाऱ्या शब्दाता क्रियाविशेषण असे म्हणतात. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडती किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो.

क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक – क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते पण ते विकारी असते म्हणजे लिंग, वचन इत्यादींचा त्याच्या रूपावर परिणाम होतो त्यानुसार ते बदलते उदा ती मुलगी चांगली गाते' या वाक्यात 'चांगली' हे 'गाते' या क्रियापदाचे विशेषण आहे जर या वाक्यातील कर्ता पुल्लिंगी ठेवला, तर हे वाक्य तो मुलगा चांगला गातो' असे होईल मूळ वाक्यातील कर्ता अनेकवचनी ठेवला, तर त्या मुली चांगल्या गातात ' असे ते वाक्य होईल म्हणजे ही क्रियाविशेषणे विकारी आहेत.

यावरून असे दिसते की, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात, त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरता वाक्यातील त्याच्या कार्यावरून ठरतो, हे आपण पाहिले आहे. तीच गोष्ट क्रियाविशेषणाच्या बाबतीतही खरी आहे. उदा. 'मोठा' हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. तो मुळात विकारी किंवा सत्यय आहे; कारण लिंगवचनांतील बदलाप्रमाणे त्याची रूपे 'मोठा-मोठी-मोठे' अशी होतात. पण त्याला तृतीयेचा 'ने' हा प्रत्यय लागून 'मोठ्याने' असे रूप तयार होते. तो लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, म्हणून तो शब्द अविकारी किंवा अव्यय, तर 'मोठा' हा शब्द विकारी किंवा सव्यय आहे.

शब्दाचे व्याकरण चालविणे म्हणजे वाक्यातीत प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम किंवा सर्वनाम यांना होणाऱ्या लिंग वचन विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ- अर्थ- प्रयोग यांची संपूर्ण माहिती मिळविली. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF या माहितीचा 'शब्दांचे व्याकरण चालविणे यासाठी उपयोग होतो याताच पदपरिस्फोट असेही म्हणतात

'शब्दांचे व्याकरण चालविणे' ही एक प्रकारे व्याकरणाच्या अभ्यासाची चाचणीच आहे. वाक्यात येणाऱ्या शब्दाची पूर्ण माहिती बिनचूकपणे सांगता येते की नाही. हे या चाचणीतून कळते आपण वाक्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दप्रकाराचा वेगळा, स्वतंत्र असा अभ्यास केला त्यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी "शब्दांचे व्याकरण चालविणे या घटकाचाही अभ्यास आवश्यक आहे वाक्यातील प्रत्येक शब्दाचा प्रकार, त्याचे कार्य यांचा जो अभ्यास आपण केला, त्याचा प्रत्यक्ष उपयोग या चाचणीत होतो शिवाय त्या शब्दाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंधही सांगता यावा हा हेतू 'व्याकरण चालविणे' या अभ्यासाच्या मागे असतो. त्या निमित्ताने व्याकरणविषयक सर्व अभ्यास एकत्रितपणे करता येतो व्याकरणाच्या अभ्यासात प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र, सखोत, सूक्ष्म अभ्यास व वाक्याचा व वाक्यातील घटकांचा एकत्रित अभ्यास होत असतो एका अर्थाने संपूर्ण व्याकरणविषयक माहितीची ही चाचणी असते.

'पदपरिस्फोट' या शब्दाचा अर्थ समजून घेऊ या पद म्हणजे वाक्यात येणारा शब्द त्याचा परिस्फोट म्हणजे त्या शब्दाचे व्याकरणातील स्वरूप उकलून दाखविणे, स्पष्ट करून दाखविणे वाक्यातील शब्दांचा परस्परांशी असणारा व्याकरणविषयक संबंध काय आहे ते स्पष्ट करून सांगणे, त्या शब्दाचे वाक्यातीत स्थान व कार्य आणि त्याचे स्वरूप सांगणे हे पदपरिस्फोट किंवा शब्दांचे व्याकरण चालविणे या अभ्यासात अपेक्षित असते.

Source: https://pdflake.com/marathi-vyakaran-pdf/

Posted by: tynishahemmetere0193543.blogspot.com

Post a Comment for "marathi typing lessons pdf free download"